रत्नागिरी : ट्रॉलर नौकांवरील जाळ्यांना टर्टल एक्सक्ल्यूडर डिव्हाईस नसल्यास होणार कारवाई

Jun 17, 2024 - 10:59
 0
रत्नागिरी : ट्रॉलर नौकांवरील जाळ्यांना टर्टल एक्सक्ल्यूडर डिव्हाईस नसल्यास होणार कारवाई

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ट्रॉलर नौकांवरील जाळ्यांना टर्टल एक्सक्ल्यूडर डिव्हाईस नसल्याप्रकरणी कारवाई झालेली नाही. ट्रॉलिंग नौकेवरील ट्रॉल जाळ्याने पकडल्या जाणाऱ्या कोळंबीवर पाश्चात्त्य देशांनी निर्यात बंदी आणली आहे. त्यामुळे पुढील मासेमारी हंगामात अशी जाळी वापरणाऱ्या ट्रॉलिंग नौकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र क्षेत्रात सुमारे १ हजार ट्रॉलिंग नौका मासेमारी करतात. या नौकांवर असलेली ट्रॉल जाळी समुद्राच्या तळापासून पृष्ठ भागापर्यंतची मासळी अडकली जाते. समुद्र तळाशी कासवांचा रहिवास असतो. त्यामुळे अशा जाळ्यात अडकलेली कासवे सुटत नाहीत. 

त्या कासवांचा मृत्यू होतो. शासन नियमानुसार या जाळ्यांना टर्टल एक्स्क्ल्यूडर डीव्हाईस असणे बंधनकारक आहे. परंतु हा डिवाईस नसल्याने जाळ्यात अडकलेली कासवे मृत्यूमुखी पडतात. या जाळ्यांमध्ये कोळंबीसुद्धा पकडली जाते. टर्टल एक्स्क्ल्यूडर डिवाईस असलेल्या जाळ्यातून कासवांना निसटण्यास मदत होते. परंतु हा डिवाईसच नसल्याचे आढळून आल्याने संपूर्ण भारतातून होणाऱ्या कोळंबी निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या सुमारे १ हजार नौका आहेत. परंतु आतापर्यंत अशा नौकांवर कोणतीही करवाई झालेली नाही. परंतु आता पाश्चात्य देशात निर्यात होणाऱ्या कोळंबीवर बंदी आल्यामुळे परकीय चलन घटणार आहे. देशाचे उत्पन्नच घटणार असल्याने आता डिवाईस नसणारी जाळी वापरणाऱ्या नौकांवर १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारी हंगामापासून कारवाई केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow