एमएचटी-सीईटी परीक्षा 2024 चा निकाल जाहीर

Jun 17, 2024 - 10:42
 0
एमएचटी-सीईटी परीक्षा 2024 चा निकाल जाहीर

◼️ 37 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाइल गुण

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेत 37 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाईल गुण मिळाले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सीईटी सेलची वेबसाईट डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नव्हता. यामुळं विद्यार्थ्यांनी काही वेळानंतर निकाल पाहण्यासाठी वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातून एमएचटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 37 विद्यार्थ्यांना गुण 100 परसेंटाइल गुण मिळाले आहेत. पीसीबी ग्रुप मधील सतरा विद्यार्थ्यांना तर पीसीएम ग्रुप मधील वीस विद्यार्थ्यांना 100 परसेंटाइल गुण मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल MHT CET परीक्षा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

जाहीर झालेल्या निकालात 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले. यामध्ये पीसीबीतील 17 आणि पीसीएम मधील 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील 7,25,052 विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुप आणि आणि पीसीएम या ग्रुप साठी परीक्षा दिली होती. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 6,75,377 विद्यार्थी हे प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. सीईटी परीक्षेचा निकाल 93.15% इतका लागला आहे.

वेबसाईट डाऊन, सीईटी सेलचं महत्त्वाचं आवाहन

सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट जिथे हा निकाल जाहीर करण्यात आला ती डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत... काही वेळानंतर आपला निकाल विद्यार्थ्यांनी पहावा अशा प्रकारच्या सूचना सीईटी सेल कडून देण्यात आले आहेत.

एमएचटी सीईटीचा निकाल कसा पाहणार?

स्टेप 1 : निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या

स्टेप 2 : cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर portal links यावर क्लिक करा

स्टेप 3 :त्यानंतर Check MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करा

स्टेप 4 :रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा

स्टेप 5 :रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा

दरम्यान, सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 17-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow