रत्नागिरी : जिल्ह्यात ६० हजार ब्रास वाळूची ऑनलाईन विक्री

Jun 19, 2024 - 11:45
Jun 19, 2024 - 11:53
 0
रत्नागिरी :  जिल्ह्यात ६० हजार ब्रास वाळूची ऑनलाईन विक्री

रत्नागिरी : अधिकृत वाळू उत्खनन व बेकायदेशीर वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनाने नवीन वाळू धोरण अमलात आणले. ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू पुरवण्यात आली. पहिल्याच हंगामात जिल्ह्यात ६० हजार ब्रास वाळूची ऑनलाईन विक्री झाली. या धोरणानुसार ६०० रुपये ब्रासने वाळू विक्री करायची आहे परंतु व खर्चासह ही वाळू २ हजार ८०० रुपये ब्रास पडते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी नवे वाळू धोरण महागच' ठरत आहे.

राज्यातील नागरिकांना बांधकामासाठी सवस्त दराने उपलब्ध  करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने धोरण राबविले आहे. अनधिकृत उत्खनास आळा घालून वालू उत्खनन साठवणूक विक्री व्यवस्थापन करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर १ वर्षासाठी १९ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारित वा धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामध्येही काही त्रुटी आल्याने शासनाने सुधारित वाळू धोरण लागू केले. मुंबई महानगर प्रदेशासाठी १२०० रुपये प्रतिद्वारा २६७ प्रतिटन) व मुंबई महानगराची प्रदेश वळून इतर ६००रु. प्रतिक्षास (रुपये १३३ प्रतिटन) इतकी स्वामित्वधनाची रक्कम निश्चित करणात आली. यामध्ये सरकारने वेळोवेळी केलेल्या सुधारणा जशाच्या तशा लागू करण्यात येतील.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, वाहतूक परवाना सेवक शुल्क व नियमानुसार शुल्क आकारण्यात येईल, सरकारी योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास (२२.५० टन) पर्यंत विनामुल्य वाळू देण्यात येईल. वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल, अशा प्रकारे शासनाने धोरण आणले. वाळूसाठी ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य केली. नोंदणी झाल्यानंतर ६०० रुपयेने वाळू  दिली जाऊ लागली; परंतु डेपोपासून ग्राहकाच्या घरापर्यंत जो वाहतूक खर्च आहे तो ग्राहकालाच करावा लागतो. त्यामुळे प्रतिब्रास सर्वसामान्यांना ही वाळू ८०० रुपयाला पड़ते. वर्षभरात जिल्हात ६० हजार ब्रास विक्री झाल्याची नोंद जिल्हा खनिकर्म विभागाकडे झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow