Maharashtra Rainfall : राज्यातील १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

Jun 19, 2024 - 12:25
 0
Maharashtra Rainfall : राज्यातील १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

पुणे : मान्सून येऊन बरेच दिवस झाले, तरीदेखील राज्यात म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. तसेच आठवडा झाला तरी मान्सून विदर्भात रेंगाळलेला आहे.

आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी काढली तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा देशात १०६ टक्के पाऊस वर्तविण्यात आला आहे. मान्सूनदेखील वेळेअगोदरच दाखल झाला. नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल झाले, परंतु, ते मोठ्या प्रमाणावर पाऊस घेऊन अद्याप आले नाहीत. राज्यातील अनेक जिल्हे तहानलेले आहेत. दुसरीकडे उन्हाचा चटकाही जाणवत आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान चाळिशीपार गेले आहे. उत्तरेकडील राज्यातही उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात १ जूनपासून १८ जूनपर्यंत झालेला पाऊस - आकडे (मिमीमध्ये)

जिल्हा जिल्हा पडलेला जिल्हा सरासरी पडलेला
पालघर ११४.१ १६२.६ धुळे ६१.९ ६३.९
ठाणे ११२.३ १८४.८ नंदुरबार १०.२ ६८.५
मुंबई शहर १४६.३ २६८.६ नांदेड ५४.९ ७३.८
मुंबई उपनगर १२८.३ २५३.७ परभणी १३४.२ ७५.१
रायगड १८४.७ २७५.४ जालना १२२.३ ७१.७
रत्नागिरी २८०.२ ३९८.९ जळगाव १९.२ ५६.८
कोल्हापूर १०० १७१.८ बुलढाणा १०५.५ ६९.१
सिंधुदुर्ग ३८६.१ ४६१.१ हिंगोली १३.९ ८८.१
सांगली १२३ ७७.२ अकोला ८४.१ ७६.१
सातारा ११३.२ १००,७ वाशिम १२१.१ ८५.५
पुणे १२२.६ ९२.९ अमरावती ५७.४ ७३.१
सोलापूर १८४.६ ६८.७ यवतमाळ ६५.५ ८१
नगर १०३.३ ६६.९ वर्धा ४९.५ ७३.७
धाराशिव ३२१.५ ४३२.७ चंद्रपूर ३२.९ ७७.५
लातूर १९९.५ ७५.८ गडचिरोली ३५ १०१.३
बीड १३८.८ ७५.८ नागपूर ४० ६८.७
छ. संभाजीनगर २६९.५ ४४५.६ भंडारा १४.८ ७४.६
नाशिक ८६.४ ८३.६ गोंदिया १६.६ ७७.७

मराठवाड्यात काही भागांत अधिक पाऊस
मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. काही भागांत पूर आल्याचे पहायला मिळाले. नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामानाने कोकणात अधिक पाऊस होतो, तिथे मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

सध्या मान्सून आठवडा झाला मंदावलेला आहे. त्यामध्ये काहीच प्रगती नाही. परंतु, पुढील दोन-तीन दिवसांमध्ये सक्रिय होऊन पुढील मजल मारेल. बंगालच्या उपसागरातील पावसाची शाखादेखील सक्रिय होईल. २० जूननंतर पावसाला जोर येईल आणि उर्वरित देशात दाखल होईल. - डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow