स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देवूडच्या पहिल्या बॅचने (२००० ते २००३) दिला १,१०,८६४/- रुपयांचा रौप्यमहोत्सवी निधी

Jun 19, 2024 - 12:31
 0
स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देवूडच्या पहिल्या बॅचने (२००० ते २००३) दिला १,१०,८६४/- रुपयांचा रौप्यमहोत्सवी निधी

देवूड : दि.१५ जून २०२४ करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्था करजुवेच्या स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, देवूडच्या पहिल्या बॅचने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निधी संकलनातिल पहिला टप्पा शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक श्री. पुजारी सर व सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांच्याकडे रोख रुपये ११०८६४/- (एक लाख दहा हजार आठशे चौसष्ट रुपये) इतका भरघोस निधी सुपूर्द करत सर्व वर्गांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे.

भेट सुपूर्द करताना पहिल्या बॅचचे वर्ग प्रतिनिधी व माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष श्री. विश्वास महादेव गोताड, (प्राथमिक शिक्षक) व ललिता सुरेश पांचाळ (अंगणवाडी सेविका)या पहिल्या बॅचच्या वतीने उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या बॅचच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षात आपण सुमारे १२५०००/- (सव्वा लाख) उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याचे विश्वास गोताड यांनी स्पष्ट केले. 

यापूर्वीही याच मार्च २००३ च्या बॅचने श्री स्वामी समर्थ विद्यालयासाठी सुमारे ४५,०००/- खर्च करून प्रोजेक्टर शाळेला भेट म्हणून सुपूर्द केला होता. शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निधी संकलन करताना २००० /२००३ बॅचच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी केलेल्या भरघोस निधी संकलनामुळेच इतका मोठा निधी संकलन होऊ शकला असे सांगताना सचिन शंकर गावणकर, अरुणा विश्वास गोताड, अविनाश घाणेकर, राकेश रहाटे, मिना घाणेकर, ललिता पांचाळ, स्वप्नाली पवार, रुपाली कुळये,  प्रविण घाणेकर, संभाजी गोणबरे, दिपक गोणबरे, कवी विनोद घाणेकर, अमित घाणेकर, कमलेश घाणेकर, किशोर घाणेकर, शैलेश घाणेकर, महेश ठोंबरे, लता घाणेकर, प्रज्ञा पवार,यांच्या सारख्या मोठ्या सहकार्य करणाऱ्या मित्र मैत्रिणींन बरोबर वर्गातील सर्वच सहकार्यांचे विशेष कौतुक करून सर्वांना धन्यवाद देत बाकी सर्व बॅचने सुद्धा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भरघोस अस अर्थ सहाय्य करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी शाळेचे सन्माननिय मुख्याध्यापक श्री. पुजारी सरांनी विश्वास गोताड, ललिता पांचाळ व त्यांच्या सर्व मित्र मैत्रिणींना विशेष धन्यवाद व भविष्यातील वाटचासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी देसाई सर, पवार सर, रहाटे सर, वसावे सर व लिपिक निलेश देसाई उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow