शिवसेना वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रम

Jun 19, 2024 - 13:52
 0
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रम

रत्नागिरी : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त ना. उदय सामंत व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयात येथे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
 
त्यानंतर साळवी स्टॉप येथील झोपडपट्टी मध्ये लाडू वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हा कार्यालयामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, सौरभ मलुष्टे, मनोज साळवी, संजय हळदणकर, अभिजीत दुडे, प्रथमेश साळवी, दुर्वेश पांगम, मंदार आमरे, रोहित सावंत, प्रवीण साळवी, आशु मोरे, कीरण गांगण, अभिजीत पटवर्धन, अमोल पावसकर, चेतन नवरंग, संदेश कीर, सुमित नाईक व तमाम शिव सैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow