रत्नागिरी : रुग्णहक्क सनद माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक : डॉ. बी. व्ही. जगताप

Jun 19, 2024 - 13:49
Jun 19, 2024 - 13:55
 0
रत्नागिरी : रुग्णहक्क सनद माहिती  प्रदर्शित  करणे बंधनकारक : डॉ. बी. व्ही. जगताप

रत्नागिरी : जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील नागरी भागात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या खासगी रुग्णालयांना महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियमान्वये नोंदणी ही शासकीय रुग्णालय देते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारित) अधिनियम २०२१ कायद्याच्या कलम ११ अ नुसार रुग्ण हक्क सनदची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांनी काढले आहेत.

रुग्णाच्या आजाराबाबतची माहिती, आजाराचे स्वरूप, आजाराचे कारण, प्रस्तावित उपचार घ्यावयाची काळजी, उपचाराचे अपेक्षित परिणाम, अपेक्षित गुंतागुंतीची शक्यता व उपचाराचा अपेक्षित खर्च इत्यादी माहिती जाणून घेण्याचा हक्क रुग्णास किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस अथवा त्याच्या जवळच्या नातेवाईकास आहे. स्त्री रुग्णाची तपासणी महिलेच्या उपस्थितीत केली जाईल. एच. आय. व्ही./एड्स झालेल्या व्यक्तीस उपचार व देखभालीचा हक्क असेल.

रुग्णाला संबंधित शुश्रूषागृहाच्या स्वागत कक्षात ठेवलेल्या तक्रार नोंदवहीत तक्रार लिहिण्याचा अधिकार असेल, शुश्रूषागृहात कार्यरत वैद्यांचे नाव, त्यांची शैक्षणिक अर्हता, भारतीय वैद्यक परिषद महाराष्ट्र वैद्यक परिषदेचा नोंदणी क्रमांक आणि त्याचा वैधता, दिनांक दर्शवणारी यादी शुश्रुषागृहाच्या स्वागत कक्षाजवळ ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी असेल. दूसरे मत घेण्याचा हक्क रुग्णाला असेल. यासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल रुग्णास अथवा त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस उपलब्ध करून दिले जातील, आंतररुग्ण कागदपत्रांची छायांकित प्रत मागणीनुसार उपलब्ध असेल. रुग्णाला सुट्टी देताना रोगनिदान, वैद्यकीय निष्कर्ष, चाचण्यांचे अहवाल, दिलेले उपचार, सुट्टी देतेवेळी रुग्णाची स्थिती व पुढील सल्ला याचा उल्लेख असलेले डिस्वार्ज कार्ड दिले जाईल. पुरविण्यात येणाऱ्या सेवा, उपचार, त्यांचे आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर विस्तृतपणं दर्शविणारे दरपत्रक छापील स्वरूपात शुश्रुषागृह दर्शनी भागात लावावे असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow