रत्नागिरी : सागरी महामार्गावरील जयगड-तवसाळ रेवदंडा-साळवखाडी पुलांना मान्यता

Jun 19, 2024 - 14:27
 0
रत्नागिरी : सागरी महामार्गावरील जयगड-तवसाळ रेवदंडा-साळवखाडी पुलांना मान्यता

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेक्स-रेड्डी या सागरी महामार्गावर कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन पुलांच्या बांधकामासोबत आणखी दोन पुलांसाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. त्यामध्ये जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड खाडी पूल आणि कुंडलिका खाडीवर रेवदंडा ते साळव खाडी पुलाचा समावेश आहे. चार पुलांचे ठेकेदार नियुक्त झाल्यामुळे सागरी महामार्गाच्या कामाला गती येणार आहे. 

कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर पूल उभारण्यासाठी एकूण चार पुलांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यातील १.६ किमी लांबीचा कुणकेश्वर पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये १६५ मीटर लांबीच्या मुख्य स्पॅनासह ३३० मीटर लांबीच्या 'आयकॉनिक' पुलाचा समावेश आहे.

२ लेनचा १.८ किमी लांबीचा काळबादेवी पूल रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी खाडीवर काळबादेवी बीच आणि सड्या मिऱ्या जोडणार आहे. या पुलाच्या कामासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून "विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड" ही कंपनी पात्र ठरली आहे. काळबादेवीसाठी २९१.६४ कोटी तर कुणकेश्वरसाठी १५८.६९ कोटी खर्च अपेक्षित आहे. या दोन पुलांबरोबर आणखी दोन, अशा एकूण चार पुलांसाठी चार कंपन्यांनी ९ निविदा भरल्या होत्या, त्यामध्ये जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड खाडी पूल ३.८ किमी मार्गासह कुंडलिका खाडीवर रेवदंडा ते साळव खाडी पूल  ४.४ किमी मार्गासह उभारण्यात येणार आहेत. या साठी विजय बिल्डकॉन कंपनीने लघुत्तम निविदा भरल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता निविदा अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. पुलांच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला जाणार आहे.

सागरी महामार्गावरील पुलाच्या निविदा अंतिम केल्यामुळे पुढे एक पाऊल पडले आहे. यातील जयगड पूल हा रत्नागिरी आणि गुहागर या दोन तालुक्यांना जोडणारा आहे. पर्यटनाच्यादृष्टीने पाला फार महत्व आहे. या महामार्गामुळे मुंबईचे अंतर कमी होणार आहे. अॅड. विलास पाटणे, रत्नागिरी

रायगडला सुरुवात सिंधुदुर्गात शेवट
सागरी महामार्गासाठी ९ हजार कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सागरी महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर २३ ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. हा महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरूंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातून सागरी मार्गाची सुरवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow