मंडणगडात पावसाच्या सरींनी राष्ट्रीय महामार्ग चिखलमय

Jun 4, 2024 - 14:53
 0
मंडणगडात पावसाच्या सरींनी राष्ट्रीय महामार्ग चिखलमय

मंडणगड : पावसांच्या सरींनी सोमवारी दुपारच्या सुमारास तालुक्यात हजेरी लावली. यामुळे चिखलमय झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. पाण्याने निसरडा झालेल्या रस्त्याने शहर परिसरासह, तुळशी घाटात अनेक ठिकाणी दुचाकी स्वारांचे अपघात घडले.

जून महिन्यात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. पावसापूर्वी एक लेन पूर्ण करण्याचे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. शेनाळे घाट ते शिरगाव याचबरोबर मंडणगड, तुळशी, पाले, पाचरळ, पाचरळ ते आंबडवे या गावांच्या हद्दीत दोन लेन करिता रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र एक लेनही अद्याप पूर्ण झालेली नाही.

रस्त्याला ठिकठिकाणी डायव्हर्शन ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे काही अंतर चांगला रस्ता तर काही अंतर खोदलेला रस्ता असा प्रवास करावा लागतो. पाऊस पडला की परिस्थिती आणखी विकट होते. यामुळे शहरापासून शेनाळे घाट व शहरापासून पालेपर्यंतचा रस्ता दुचाकी व लहान वाहनांसाठी अडचणीचा ठरत आहे. पूर्ण करण्यात आलेली एक लेन वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 04/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow