'मृगां'विनाच मृग संपला

Jun 19, 2024 - 15:49
 0
'मृगां'विनाच मृग संपला

साखरपा : मृग नक्षत्राच्या आगमनाची वर्दी देणारे मृग कीटकांचे दर्शन यंदा झालेच नाही. वाढते तापमान आणि जमिनीतील वाढता आम्लधर्म यामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

मृग नक्षत्र हे साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. त्याचवेळी जमिनीवर ठिकठिकाणी मूग हे अष्टपाद कीटक दिसत असत. लाल रंगाचे, वेलव्हेटसारखी पाठ असलेले हे कीटक अत्यंत आकर्षक दिसत असत. हे कीटक दिसले की, शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची खात्री पटते. हे कीटक जमिनीतून कसे येतात आणि नेमके मृग नक्षत्रात कसे येतात, याबाबत लोकांना खूप कुतूहल आहे. पूर्वी सर्रास दिसणारे हे कीटक यंदा मात्र दिसलेच नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:59 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow