२१ जूनला मुंबईत डाक अदालतीचे आयोजन

May 27, 2024 - 15:29
 0
२१ जूनला मुंबईत डाक अदालतीचे आयोजन


रत्नागिरी : पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. ही सेवा देताना, संभाषणामध्ये/पत्रव्यवहारमध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते.

या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे दिनांक २१ जून रोजी दु. ३ वाजता, पाचवा मजला, जी. पी. ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये १२७ वी डाक अदालत आयोजित केली आहे, अशी माहिती मुंबई मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांनी दिली.
  
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow