सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

May 27, 2024 - 15:26
 0
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील रत्नागिरी रेल्वे स्टेशन स्टॉपच्या मागील बाजूस तसेच सुरेशा पॉईंट येथील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार २५ मे रोजी सायंकाळी ७ ते ८ वा. कालावधीत करण्यात आली आहे. रोहन सुभाष पोमेंडकर आणि सुयोग शशिकांत सुवरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही दारू पिण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी समोर दारूच्या बाटल्या ठेवून पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 27-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow