यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना ७६ दिवस सुट्टया

Jun 19, 2024 - 17:28
Jun 19, 2024 - 17:30
 0
यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना ७६ दिवस सुट्टया

◼️ रविवार मिळून वर्षभरात एकूण १२४ दिवस शाळा बंद राहणार 

रत्नागिरी : राज्यात २०२४- २५ या शैक्षणिक वर्षाची सुट्टयांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. त्यानुसार या वर्षामध्ये ७६ सार्वजनिक सुट्ट्या आणि वर्षातील रविवार असे मिळून १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. त्यामध्ये दिवाळीची सुट्टी १२ दिवस आहे. 

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांची वेळ सोमवार ते शुक्रवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ तसेच शनिवारी सकाळी ७.३० ते १२ अशी असणार मराठी आणि उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी जून ते ऑक्टोबर या शैक्षणिक पहिल्या सत्रात एकूण ३२ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. तसेच उर्दू माध्यमाच्या शाळा २९ दिवस बंद राहणार आहेत.

मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळांना पहिल्या सत्रात दि. १७ जून रोजी बकरी ईदची सुट्टी आहे. तसेच दि. २१ जूनला वटपौर्णिमा, दि. १७ जुलै मोहरम, दि. १९ जुलैला महाराष्ट्रीय बेंदूर, ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी, १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष दिन, ७ सप्टेंबरला गणेशचतुर्थी, ११ सप्टेंबरला गौरीपूजन, १६ सप्टेंबरला ईद ए मिलाद, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती, १२ ऑक्टोबर दसरा, २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १४ दिवस दिवाळी सुट्टी, १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती, २५ डिसेंबरला ख्रिसमस, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून दि. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी, ३१ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी अशा तीन सुट्ट्या राखीव असणार आहेत. त्याचबरोबर दोन स्थानिक सुट्ट्या असणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow