कोकणातील एक हजार पन्नास गावांना भूस्खलन व दरडींचा धोका !

Jun 19, 2024 - 16:23
Jun 19, 2024 - 16:38
 0
कोकणातील एक हजार पन्नास गावांना भूस्खलन व दरडींचा धोका !

ठाणे : पावसाळा आला की पुराचा तडाखा, वादळ आले की वादळाचा तडाखा, पाऊस वाढला की दरडींचा धोका ही संकटांची मालिका कोकणच्या पाचवीला पुजल्यासारखीच आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फयाण, निसर्ग, तौक्ते या तीन वादळांनी कोकणला हादरे दिले. जवळपास ६ ते ७ हजार कोटींची हानी या काळात झाली. पालघरमधील डहाणू, तलासरीत सातत्याने होणारे भूकंप, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळांमध्ये सातत्याने सापडणाऱ्या आंबा, काजू, नारळी पोफळीच्या बागा आणि जवळपास १,०५० गावांवर पावसाळ्यात भूस्खलनाची टांगती तलवार कायम आहे. यामुळे परिसरातील लोक भीतीच्या छायेत आहेत.

वाढती वादळे आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा रोखता येईल, यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित मिळून जवळपास १० हजार कोटी खर्चाचा आराखडा तयार करत आहे. पालघरची भूकंपग्रस्त गावे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील दरडग्रस्त आणि वादळात सापडणाऱ्या गावांसाठी हा आराखडा आहे. कोकणातील जवळपास १,०५० गावे या नव्या आराखड्यात समाविष्ट होणार आहेत. भूअंतर्गत वीज वाहिन्या, अत्याधुनिक निवारा केंद्रे आणि पक्क्या घरांचे नवे स्ट्रक्चर अशा काही उपाययोजना यात आखल्या जाणार आहेत. फयाण, निसर्ग, तौक्ते अशा वादळांनी गेल्या २० वर्षांत कोकणला मोठे तडाखे दिले आहेत. या प्रत्येक वादळात सरासरी २ हजार कोटींची हानी झाल्याचे वादळानंतरच्या नुकसानीच्या आढाव्यातून पुढे आले आहे. त्यानंतर जाहीर करण्यात आले. यात ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होता. आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा ही यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

रत्नागिरी-संगमेश्वरमधील २९ गावांना भूस्खलनाचा धोका
संगमेश्वर तालुक्यातील २९ गावांना पावसाळ्यात भूस्खलन व दरडी पडण्याची शक्यता असल्याने येथील ग्रामपंचायतींना संगमेश्वर तहसील कार्यालयाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महसूल विभागाकडून ओझरे बुद्रुक (गावठाण व बौद्धवाडी), निनावे (रामवाडी व बौद्धवाडी), निवधे (कदमवाडी, चव्हाणवाडी), बामणोली (मावळत व मधलीवाडी), कसबा (दारकवाडी), अंगवली, मुर्शी (भेंडीचा माळ व धनगरवाडी), दख्खीण (माईनवाडी), मासरंग (बौद्धवाडी), कोळंबे (आंबेकरवाडी, चव्हाणवाडी), नायरी (धनगरवाडी), निवे खुर्द (परबवाडी) अणदेरी (गाव रस्ता), तळेकांटे (कळंबटवाडी व मांजरेकर वाडी), शृंगारपूर (नायरी रस्ता), तिवरे घेरा प्रचितगड (कुणबीवाडी, गुरववाडी, बौद्धवाडी, पवार कोंड), पूर्ये तर्फे देवळे (बौद्धवाडी), कुळये (धनगरवाडी), ताम्हाणे, मांजरे (देसाईवाडी), देवळे (चाफवली व राव वाडी), बेलारी बुद्रूक (शेलारवाडी), मानसकोंड (फेपडेवाडी किंजळवाडी), कातुर्डी कोंड, नारडुवे (जोशीवाडी), शेंबवणे (गोमाणेवाडी), मळदेवाडी या गावे व वाड्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. समुद्रकिनारपट्टींच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये भूअंतर्गत वीज वाहिन्यांचे नवे प्रकल्प 

१ ऑक्सिजन पुरवणाऱ्या जंगलांचे संवर्धन हासुद्धा पर्यावरण विभागाच्या कार्यप्रणालीचा नवा अजेंडा आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्रीतील जंगले वाचवण्यासाठी कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये दीड हजार गावे इको सेन्सिटिव्हमध्ये घेण्यात आली.

२ सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दरडग्रस्त आणि समुद्रकिनारी उधाणाच्या टप्प्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले भागातील जवळपास ७५ गावे आणि सह्याद्री पट्ट्यातील वैभववाडी ते सावंतवाडी येथील १०३ गावे अशा गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव आहे.

३ रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या पट्ट्यातील समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जवळपास १०९ गावे तसेच सह्याद्री पट्ट्यातील मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर यामधील ५०३ गावे अशी नव्या आराखड्यात समाविष्ट आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:51 PM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow