रत्नागिरीत मोकाट जनावरांचा उपद्रव

Jun 20, 2024 - 11:31
 0
रत्नागिरीत मोकाट जनावरांचा उपद्रव

रत्नागिरी : पावसाळा सुरू झाल्यावर शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा सुरू झाला आहे. 

बाजारपेठेत ठाण मांडून ही जनावरे बसत असल्याने वाहतुकीला अडचण ठरत आहे. मागील तीन महिने गाडीतळ येथील लक्ष्मीचौकानजिक मोठ्या प्रमाणात गुरे जमत असून, त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. शहरातील साळवीस्टॉप, थिबा पॅलेस रोड, हिंदू कॉलनी, सन्मित्र नगर, आठवडा बाजार, गाडीतळ, ८० फुटी हायवे, मुरुगवाडा, मिरकरवाडा, किल्ला या परिसरात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात असून, रात्रीच्या वेळी ते दुचाकीचा पाठलाग करत आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 20-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow