जि.प. शाळा लांजा डाफळेवाडी मध्ये मुलांनी केली परसबाग लागवड!

Jul 1, 2024 - 09:48
 0
जि.प. शाळा लांजा डाफळेवाडी मध्ये मुलांनी केली परसबाग लागवड!

लांजा : शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जि.प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे शुक्रवार दिनांक २८ जून रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. 

शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सहभागी होताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थी प्रत्यक्ष घेत होते. सदर उपक्रमासाठी शाळेतील इ.१ली ते ७ वीच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली होती. या परसबागेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभणार असून, शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच यामधून तयार होणाऱ्या पालेभाज्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वापरावयाच्या  असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस व पौष्टिक, चवीष्ट आहार मिळणार आहे.

शाळेमध्ये परस बाग निर्मिती करताना आधुनिक शेती व यांत्रिक शेती, बैलांचे जोत व ट्रॅक्टर च्या सहाय्याने नांगरणी करून मशागत करून, अळी तयार करून पाले भाजी, पडवळ, काकडी, टोमॅटो, मिरची, वांयगे, घेवडा, दोडका, कारली, झेंडूची झाडे बियाणे लावण्यात व पेरण्यात आली. शिक्षणा सोबत मुलांना शेतीची आवड व शेतीविषयक माहिती मिळावी ह्या साठी हा उपक्रम शाळे मध्ये राबविण्यात आला.

या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्री. सावंग, केंद्र प्रमुख श्री. पावसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अनुजा पांचाळ, नगरसेविका सौ. दुर्वा भाईशेट्ये, शाळा सुधार समिती सदस्य श्री. प्रसाद भाईशेट्ये, श्री. बाबू पांचाळ, ट्रॅक्टर मालक श्री. कैलास उपशेटे, बैल व नांगरमालक श्री॰वसंत कुंभार, श्री.  तुकाराम कुंभार, श्री. राजू तुळसणकर,श्री. नरेश कुंभार,श्री. फिरोज नेवरेकर, सौ. दुबळे, सौ. संजीवनी पांचाळ, सौ.मुगारी, सौ.पांचाळ, सौ.शिगम, श्री. राजेश कांबळे, मुख्याध्यापक श्री.मनोज रेडिज, शिक्षिका सौ. दिपाली यादव, सौ. दीपा मुळ्ये, सौ. रूक्मिणी कदम-पाटील या सर्वांनी सहभाग घेतला खास करून जागा मालक यांचे आभार मानण्यात आले. श्री दिलीप तोडकरी श्री संजय तोडकरी, श्री विलास तोडकरी यांनी परस बागे साठी जागा उपलब्ध करून दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow