संगमेश्वर : तुरळ-धामणी येथे गटाराचे पाणी थेट रस्त्यावर

Jun 20, 2024 - 12:14
 0
संगमेश्वर : तुरळ-धामणी येथे गटाराचे पाणी थेट रस्त्यावर

संगमेश्वर : महामार्गावर संगमेश्वर धामणी ते तुरळ दरम्यान रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित गटार नसल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त होत आहे तर काही ठिकाणी मोठे खड़े पडल्याने अपघात हो पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येथे गेली तीन ते चार वर्षे मुंबई गोवा राष्ट्रीय महामागचि काम धिम्या गतीने सुरु असून अनेक ठिकाणी ठेकेदाराने गटाराची व्यवस्थाच केलेली नाही. मागील वर्षों सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनी महमार्गावरील समस्या दूर करू असे आश्वासन दिले होते. मात्र कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी आरवली येथे गटारांची व्यवस्था करायला हवी होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पावसाळा सुरु झाला तरीही महामार्गावर ठेकेदाराकडून नियोजन केले गेले नाही. आरवली येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.

प्रशासनाच्या डिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशाना बसत आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली या परिसारात्त मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. अगोदर खड्डे आणि आता चिखल यामुळे या परिसरातून चालणे कठीण झाले आहे. या चिखलाचा त्रास वाहधारकांनाही होत आहे. तुरळ ते धामणी दरम्यान सत्यावर गटाराचे पाणी येत आहे. खड्डामध्ये पाणी साचून गाडीही फसण्याची शक्यता आहे. तसेच पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 20/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow