दापोली : आंजर्लेत तरुणाची आत्महत्या

Jun 8, 2024 - 12:04
 0
दापोली : आंजर्लेत तरुणाची आत्महत्या

दाभोळ : दापोली तालुक्यातील आंजर्ले ताडाचाकोंड येथील २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंजर्ले ताडाचाकोंड येथील राकेश रामचंद्र शिगवण या तरुणाने ५ जूनला सकाळी त्याच्या घराजवळ असलेल्या काजूच्या झाडाला दोरीने बांधून गळफास लावून घेतला. ही घटना लक्षात आल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल राजू मोहिते करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 08-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow