रत्नागिरी : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिर

Jun 20, 2024 - 14:20
 0
रत्नागिरी : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिर

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुक्याच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

या शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष सौरभ पाटील, राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, सागर पावसकर, विभाग अध्यक्ष जयेश फणसेकर, अखिल शाहू, सोम पिलणकर, सचिन सांडीम आदी पदाधिकाऱ्यांसह अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मेहनत घेतली. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून यावेळेस मनसेचे या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल आभार मानण्यात आले.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 20-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow