मसाले पिकांमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे उत्कृष्ट कार्य; काश्मीरमध्ये गौरव

Jun 20, 2024 - 14:53
Jun 20, 2024 - 14:57
 0
मसाले पिकांमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे उत्कृष्ट कार्य; काश्मीरमध्ये गौरव

दाभोळ : मसालावर्गीय पिकांची उत्तम प्रतीची कलमे, रोप निर्मिती करणे आणि मसालावर्गीय पिकांखालील क्षेत्र वाढवणे या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या एकात्मिक फलोद्यान विकास अभियान योजनेत २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा काश्मीर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आले.

एकात्मिक फलोद्यान विकास अभियान योजना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध १५ संशोधन केंद्रांवर कार्यरत आहे. मसालावर्गीय पिकांच्या उत्तम प्रतीच्या कलमे, रोप निर्मिती करणे आणि मसालावर्गीय पिकांखालील क्षेत्र वाढावे असा याचा उद्देश आहे, त्यासाठी सुपारी व मसाला विकास संचालनालय केरळ यांच्याकडून दरवों अनुदानही मिळते. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांसाठी मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावर यावर मोफत शेतकरी प्रशिक्षण कोकणात घेण्यात येते. एकात्मिक फलोद्यान विकास अभियान योजनेची १८ वो वार्षिक सभा जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ई- काष्मिर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला उद्यानविद्या आयुक्त डॉ. प्रभात कुमार, संचालक डॉ. विनय भारद्वाज, डॉ. आर. दिनेश हे उपस्थित होते. 

या सभेला देशातील विविध ४५ कृषी विद्यापीठे आणि भारतीय अनुसंधान परिषदेचे विविध संशोधन केंद्रातील प्रतिनीधी यांनी २०२३-२४ या वर्षामध्ये केलेल्या कामाचे सादरीकरण केले, त्यामध्ये दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून २०२३-२०२४ च्या कामाचा आढावा सादर करण्यात आला. योजनेचे सह-प्रकल्प प्रमुख डॉ. नितेश दळवी हे उपस्थित होते. २०२३-२४ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आले. 

या योजनेच्या यशासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालकाकडे डॉ. पराग हळदवणर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. नीतेश दळवी यांच्यासह विद्यापीठाअंतर्गत विविध संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञ आणि या योजनेचे कर्मचारी यांचा सहभाग महत्वाचा आहे, असा या योजनेचे मुख्य उद्देश आहे. (उदा. काळिमिरी, दालचिनी, कोकम, जायफळ, हळद, आले इ.) हे क्षेत्र वाढविणे असे आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 20/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow