चिपळूण : घरगुती कचरा संकलनासाठी आता 'क्यूआर कोड सिस्टीम'

Jun 20, 2024 - 15:29
 0
चिपळूण : घरगुती कचरा संकलनासाठी आता 'क्यूआर कोड सिस्टीम'

चिपळूण : घरगुती कचरा संकलनासाठी आता चिपळूण शहरात 'क्यूआर कोड सिस्टीम' आणण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियनांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र हा नवा प्रयोग करण्यात आला असून त्या माध्यमातून रोजच्या रोज घरगुती कचरा संकलन होतो की, नाही आणि कचऱ्याचे योग्य नियोजन केले जाते की नाही याबाबत माहिती या क्यूआर कोडमुळे मिळणार आहे. त्यामुळे आता घरगुती कचऱ्यालाही आधुनिक जगात क्यूआर कोड लागणार आहे.

शहरातील पाग विभागात गृहनिर्माण सोसायटीमधील इमारतीना असे क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. या क्यूआर कोडवर पर नंबरदेखील असणार आहे. त्याच पद्धतीने ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी प्रत्येक सदनिका धारकाला दोन क्यूआर कोड देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या घरातील कचऱ्याच्या डब्यावर हे दोन क्यूआर कोड लावायचे आहेत. सुक्या कचऱ्यासाठी एक आणि ओल्या कचऱ्यासाठी दुसरा असे दोन क्यूआर कोड देण्यात आले आहेत.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगरपालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे, ओला व सुका कचरा घरातूनच वर्गीकरण करून घंटागाडीत यावा, या उद्देशाने क्यूआर कोडचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागात रोज त्याच कालावधीत घंटागाडी येते का, प्रत्येक प्रभागातील कचरा नित्यनियमाने उचलला जातो का, नागरिक त्या घंटागाडीमध्ये कचरा टाकतात का, ओला व सुका कचऱ्याचे वर्गिकरण होते का, यासाठी हा क्यूआर कोड महत्वाचा आहे. एखाद्या नागरिकाचा घरगुती कचरा घंटागाडीत आला नाही तर ते तपासणे सहजशक्य होणार आहे. त्या माध्यमातून रस्त्यावर, नदीमध्ये व मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्या लोकांचा शोध घेता येणार आहे. त्यामुळे हा क्यूआर कोड महत्त्वपूर्ण असून चिपळूण शहर परिसरात इमारतीवर असे क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. शिवाय नागरिकांनाही ते देण्यात आले आहेत.

जादा मनुष्यबळाची गरज...
देशासह संपूर्ण राज्यात घरगुती कचऱ्याला क्यूआर कोड देण्यात येत आहेत. त्या माध्यमातून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला अधिक गती येणार आहे. नगपरिषदेच्या माध्यमातून शहरात हे क्यूआर कोड लावले जात आहेत. मात्र, कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या नागरिकाचा क्यूआर कोड दररोज स्कॅन होणार कसा? त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ लागणार आहे. ही समस्या नगर पालिकेच्या आरोग्य विभागासमोर असल्याने ही योजना यशस्वी होते की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 20/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow