Ratnagiri : शीळ धरण ७९ टक्के तर पानवल ८० टक्के भरले

Jun 26, 2024 - 12:43
Jun 26, 2024 - 12:44
 0
Ratnagiri : शीळ धरण ७९ टक्के तर पानवल ८० टक्के भरले

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण ७९ टक्के भरले आहे. धरणाची पाईपलाईन ११९.४० मीटर इतकी झाली आहे. म्हणजेच या धरणातील पाणीसाठा २.९६३ द.ल.घ.मी. इतकी झाला आहे. पानवल धरणसुद्धा ८० टक्के भरले असून दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्यानंतर रत्नागिरीकरांना अर्धातास वाढीव वेळेपर्यंत पाणीपुरवठा होवू शकणार आहे. 

सध्या नळधारकांना दीड तास पाणी पुरवठा होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची साठवण क्षमता ४. ३७१ द.ल.घ.मी. इतकी आहे. मंगळवारी धरणात २.९६३ ९६३ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी १२०.३० मीटर इतकी असून आता ती ११९.४० मीटर इतकी झाली आहे. म्हणजेच शीळ धरण ७९ टक्के भरले आहे. पावसाने सातत्य राखले तर पुढील आठवड्याच्या आत शीळ धरण ओव्हरफ्लो होऊन रत्नागिरीकरांना दीड तासांच्याऐवजी दोन तास पाणी पुरवठा करता येऊ शकणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:12 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow