रत्नागिरी : स्वा. सावरकर नाट्यगृहात 'त्रिवार जयजयकार'चे सादरीकरण

Jun 21, 2024 - 11:17
Jun 21, 2024 - 12:48
 0
रत्नागिरी : स्वा. सावरकर नाट्यगृहात 'त्रिवार जयजयकार'चे सादरीकरण

रत्नागिरी : स्वा. सावरकर नाट्यगृहात त्रिवार जयजयकार हा रामगीतांवर आधारित नृत्याविष्कार रंगला. वेदश्री नृत्यालयाच्या संचालिका रूपाली लिमये यांच्या कथ्थक नृत्यवर्गाला २५ वर्षे पूर्ण झाली या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन और जया सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पितांबरी उद्योग समूहाचे अधिकारी श्रीहरी शौचे, भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, साईश्री नृत्यवर्गाच्या संचालिका मिताली भिडे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी केले. कार्यक्रमाला पालक, माजी विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात  रामअष्टकाने झाली. ग. दि. माडगूळकर रचित गीतरामायणातील राम जन्मला गं सखे, स्वयंवर झाले सीतेचे, पेटवी लंका हनुमंत, सेतू बांधूया सागरी, त्रिवार जयजयकार या गीतांवर नृत्याविष्कार सादर करण्यात आला. त्यानंतर कुणी कुणाचे नाही जगाती एकाब तो श्रीराम हे भजन सादर झाले. बजाओ ढोल स्वागत के या गीतानी कार्यक्रमाची रंगत वाढली. शेवटी आदीपुरुष या चित्रपटातील जय श्रीराम जय श्रीराम राजाराम या गीताने सांगता झाली. या कार्यक्रमाचे संयोजन, संकल्पना नृत्य दिग्दर्शन गुरू रुपाली लिमये यांनी केले.

कार्यक्रम सादरीकरणारा रुपाली लिमये यांच्यासह शिष्या वेदांती लिमये, सारा काळे, पंकजा जाधव, जान्हवी वहाळकर, स्मितल जोशी, शुभ्रा सार्दळ, जिज्ञा बोरवणकर, कनक भिडे, मधुरा घुगरे, तीथों भिंगार्डे, साक्षी तुपे, आराध्या साळवी, आराध्या कुलकर्णी, श्रावी बिरादार, तीर्था पवार, सावनी शिंदे, वरदा बोंडाळे यांनी भाग घेतला, माजी विद्यार्थिनी चैत्राली लिमये, प्रियांका ढोकरे यांनी गुरू लिमये यांच्याबद्दलच्या भावना मनोगतात व्यक्त केल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow