सौभाग्याचे लेणे मंगळसूत्र उतरवणार नाही ; महाराष्ट्रातील गवळी समाजाचा निर्णय

May 27, 2024 - 17:08
 0
सौभाग्याचे लेणे मंगळसूत्र उतरवणार नाही ;   महाराष्ट्रातील  गवळी समाजाचा निर्णय

खेड :   संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाजाने एका पारंपरिक रूढी परंपरेला तिलांजली दिली असून पतीच्या निधनानंतर पत्नीचं सौभाग्याचं लेणे असलेले मंगळसूत्र उतरवायचे नाही, असा निर्णय गवळी समाजाने घेतला आहे, अशी माहिती समाज संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी दिली आहे. त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील गवळी समाजामध्ये हीच पद्धत यापुढे सुरू असे, असे बिरवटकर यांनी खेड येथे कार्यक्रमात सांगितले आहे.

महाराष्ट्र चॅरिटेबल ट्रस्टच्या खेड तालुका शाखेचा ४४ वा वर्धापन दिन खेडमधील श्री दग तटकरे सभागृहात संपन्न झाला. पुरोगामी महाराष्ट्रात जुन्या रितीरिवाज, रूढी व परंपरांना गवळी समाजाने चिकित्सा करत मानवतेला बाधा पोहोचविणारा परंपराना तिलांजली देत महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती देताना विरवटकर म्हणाले, एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती आपले माहेरचे सर्व संबंध तोडून सासरी येते. त्या ठिकाणी तिचं नाव देखील बदललं जातं, पतीसाठी तिचे सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र हेच तिचा जीव आणि प्राण असतो त्यामुळे दुर्दैवाने जर तीच्या पतीचे निधन झालं तर मंगळसुत्राला ती सर्वस्व मानते म्हणून मंगळसूत्र उतरवायचं नाही हा निर्णय समाजाने घेतला आहे. यावेळी बीरवटकर, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यातील गवळी समाज बांधवांमधील जी मुले परदेशात शिक्षणासाठी जाणार असतील त्यांचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्रीय यादव चारिटी ट्रस्ट करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:33 PM 27/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow