रत्नागिरी : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योग प्रशिक्षण

Jun 24, 2024 - 10:12
 0
रत्नागिरी : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योग प्रशिक्षण

रत्नागिरी : जागतिक योग दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर ॲड. सौ. जया उदय सामंत यांचे सिद्धिविनायक हॉल, रत्नागिरी येथे महिलांसाठी योग प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.

यावेळी, रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना होणार्‍या त्रासावर उपाय असलेली अशी सहज शक्य असलेली काही आसने जसे की ताडासन, तितली आसन, मार्जरासन, अर्ध मत्स्येंद्रासन, धनुरासन, इत्यादी. व मान, पाठ, पोट यासाठी उपयुक्त अशी काही आसने त्यांनी करून घेतली. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आहार, विहारावर लक्ष ठेवण्याचे महत्व सांगून त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच ध्यानाचे फायदे सांगत महिलांकडून प्राणायाम व ध्यान देखील करून घेतले. स्वतःचे व कुटुंबाचे स्वास्थ्य जपण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप व नियमित व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहे असं सौ. जया सामंत म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 24-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow