लांजा : खावडी पिलकेवाडी येथील वृद्ध महिला बेपत्ता

Jul 5, 2024 - 11:38
Jul 5, 2024 - 11:51
 0
लांजा : खावडी पिलकेवाडी येथील वृद्ध महिला  बेपत्ता

लांजा : तालुक्यातील खावडी-पिलकेवाडी येथील वृद्धा बेपत्ता झाली असून, ती डॉक्टरांकडे जाते, असे सांगून निघून गेली; मात्र घरात न परतल्याने तिच्या दिराने लांजा पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रभागा वासुदेव पिलके (वय ६५) या २० जूनला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरातून निघताना तिचा दीर रघुनाथ पिलके यांची पत्नी रसिका रघुनाथ पिलके हिला गोंडेसखल लांजा येथील डॉक्टरांकडे औषध आणण्यासाठी जात, असे सांगून निघून गेली. त्या घरी परत न आल्याने त्यांचा दीर रघुनाथ यशवंत पिलके (वय ४२) यांनी आजुबाजूला शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली. सर्वत्र शोध घेऊनही थांगपत्ता लागत नसल्याने अखेर रघुनाथ पिलके यांनी २३ जूनला लांजा पोलिस ठाण्यात चंद्रभागा पिलके बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 05/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow