रत्नागिरी : खालगाव गोताडवाडीतील नुकसानग्रस्त घरांची अण्णा सामंत यांनी केली पाहणी

Jun 24, 2024 - 10:20
Jun 24, 2024 - 10:21
 0
रत्नागिरी :   खालगाव गोताडवाडीतील नुकसानग्रस्त घरांची अण्णा सामंत यांनी केली पाहणी

रत्नागिरी : तालुक्यातील खालगावमधील गोताडवाडी येथे २० जून रोजी झालेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या घरांची ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे खालगाव गोताडवाडीला फटका बसला होता. यात दोन घरांचे नुकसान झाले होते. याची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ नुकसानग्रस्तांना वस्तुरूपी मदत पोहोच केली. तसेच उदय सामंत यांच्या आदेशानुसार नुकसान झालेल्या भागातील वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्यात आला असून तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ पंचनामे देखील करण्यात आले. यानंतर उद्योगमंत्री सामंत यांचे वडील व ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन नुकसान झालेल्यांच्या खांद्यावर थाप मारून अश्वस्त केले. यावेळी प्रवीण पांचाळ, शंकर सोनवडकर, दत्ताराम गोताड, विष्णू गोताड, मनोहर गोताड, नेताजी पाटील आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow