रत्नागिरी : 'आरजू टेक्सोल' कंपनीचा ४ कोटींचा माल पडून

May 30, 2024 - 09:53
May 30, 2024 - 09:56
 0
रत्नागिरी : 'आरजू टेक्सोल' कंपनीचा ४ कोटींचा माल पडून

रत्नागिरी : आरजू टेक्सोल कंपनीचे चांगलेच दिवाळे निघाले आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एमआयडीसीतल सुसज्ज ऑफिस, एक प्रशिक्षण केंद्र, गोदाम सील केली आहेत. मशीनरीसह कच्चा, पक्का असा सुमारे ४ कोटींचा माल त्यामुळे पडून आहे. हे सर्व भाड्याने घेतले असल्याने कंपनीची वैयक्तिक मोठी मालमत्ता नसल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारांची रीघ सुरूच आहे. बुधवारी ४० गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यावरून या कंपनीची व्याप्ती मोठी असून, गुंतवणूकदारांना कोट्यवधीची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत आहे. एमआयडीसीत जे ती जागा भाड्याने घेतल्या आहेत. त्यापैकी फक्त एका जागेसाठी कंपनीने एमआयडीसीची परवानगी घेतली आहे. उर्वरित दोन जागेसाठी कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे या तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी ऑफिस, ट्रेनिंग सेंटर, गोदाम सील केले आहे. कंपनीची दुसरी बाजू पुढे येत आहे. कंपनी कच्चा माल देऊन बनवलेला पक्का माल स्वतः घेऊन तो मार्केटमध्ये विकला जात होता, परंतु अनेक ग्राहकांनी बनविण्यासाठी दिलेल्या मालापैकी ६० टक्केच्या वर माल खराब केला आहे. त्यामुळे तो माल कंपनी घेऊन तोटा करून घेणार नाही. त्याचा बोजा गुंतवणूकदारांवरच पडला आहे. तसेच काही गुंतवणूकदारांचा परतावाही दिला आहे. काही १० ते २० हजारांसाठीही तक्रारी येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. उदाहरणार्थ २ लाख दिले तर कंपनीने १ लाख ९० हजार परत दिले आहेत, परंतु १० हजारांसाठीही तक्रारी झाल्याचे तपासात पुढे आले आहे. आतापर्यंत दीड कोटींवर फसवणुकीचा आकडा गेला आहे, परंतु कंपनीकडे अजूनही ४० ते ५० लाखांच्या मशनरीसह कच्चा, पक्का असा ४ कोटींचा माल पडून असल्याचे समजते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 30/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow