सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांचं नोंदणी पद्धतीनं लग्न

Jun 24, 2024 - 11:27
Jun 24, 2024 - 11:33
 0
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांचं नोंदणी पद्धतीनं लग्न

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोनाक्षीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न केलं. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोत सोनाक्षी आणि झहीर हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिसून येत आहे.

सोनाक्षी आणि झहीर यांनी आपल्या कुटुंबाच्या उपस्थित नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षी हिनं इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या लाडक्या लेकीसाठी आनंदी असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोत सोनाक्षी आणि झहीर हे सही करताना पाहायला मिळताय. सोनाक्षी आणि झहीरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

सोनाक्षी हिनं कॅप्शमध्ये लिहलं, 'आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (23.06.2017) एकमेकांच्या डोळ्यात आम्ही प्रेम पाहिलं आणि ते प्रेम जपण्याचा निर्णय घेतला. त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं आणि या क्षणापर्यंत नेलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आता आम्ही पती आणि पत्नी झालो आहोत. प्रेम, आशा आणि एकमेंकासोबत सर्वगोष्टी सुंदर आहेत, आतापासून आम्ही कायमचे साथी झालो आहोत, असे तिनं लिहलं'. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 24-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow