स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेला विरोध; 'मनसे'ची भूमिका

Jun 24, 2024 - 16:19
Jun 24, 2024 - 16:23
 0
स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेला विरोध; 'मनसे'ची भूमिका

गुहागर : केंद्र सरकारच्या स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत अनेक शंका निर्माण होत आहेत. सर्वसामान्य ग्राहक यामध्ये भरडले जाणार असून, ही योजना जिल्ह्यात राबविण्यास विरोध आहे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी घेतली.

वीज बिल थकवणाऱ्या किंवा वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रण यावे, याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट प्रीपेड मीटर योजना आणली गेली होती. या योजनेच्या माध्यमातून महावितरणचे जे काही वीज ग्राहक आहेत त्यांच्याकडे सध्याचे असलेले वीज मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार आहेत. सध्याचे जे काही मीटर आहेत त्या मीटरमध्ये प्रत्येक महिन्याला किती वीज वापरली जाते, याची नोंद दर महिन्याला वीज कंपनीद्वारे घेतली जाते आणि त्याप्रमाणे बील काढण्यात येते.

जितके पैसे भराल तितकीच वीज ग्राहकांना वापरता येईल. तसेच तुम्ही किती विजेचा वापर केला याची माहिती ग्राहकाला मोबाईल अॅपच्या माध्यमातून बघता येईल. या मीटरला रिचार्ज केल्यानंतरच विजेचा वापर करता येणे शक्य होईल, अशा पद्धतीचे हे मीटर आहेत. सध्या वीज बिल आल्यानंतर पुढील काही दिवसांची मुदत असते. मात्र, स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये अशी मुदत मिळणार नसल्याने याला विरोध करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:46 PM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow