रत्नागिरी : नाचणे रोड येथील आठवडा बाजारात व्यापारी संकुल उभारण्याची मनसेची मागणी

Jun 24, 2024 - 12:04
Jun 24, 2024 - 12:05
 0
रत्नागिरी : नाचणे रोड येथील आठवडा बाजारात व्यापारी संकुल उभारण्याची मनसेची मागणी

रत्नागिरी : शहरातील नाचणे रोड येथे दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो. या जागेत आता नागरिकांच्या सोयीसाठी व पालिकेच्या उत्पन्नाच्यादृष्टीने व्यापारी संकूल उभारावे, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

मनसेतर्फे उपमुख्याधिकारी माने यांना निवेदनात देण्यात आले. आठवडा बाजारच्या या जागेत दोनमजली इमारत उभारण्यात यावी. यामध्ये तळमजल्यावर आतील बाजूस भाजीपाला व फळविक्रीसाठी स्वतंत्र विभाग आणि मांस व मत्स्यविक्रीसाठी स्वतंत्र विभाग करावा. बाहेरील बाजूस दुकानगाळे असावे. दुसऱ्या मजल्यावर बहुपयोगी सभागृह बांधण्यात यावे, अशी मागणीवजा सूचना मनसेतर्फे करण्यात आली आहे. शहर विकासाच्यादृष्टीने पालिका प्रशासनाने विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

या वेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर संघटक अमोल श्रीनाथ, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 24-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow