एसटी च्या नव्या योजनेचा वडाप वाहतुकीला फटका; तर महामंडळाला २५००० रुपयांचा नफा

Jun 24, 2024 - 17:32
Jun 24, 2024 - 17:36
 0
एसटी च्या नव्या योजनेचा वडाप वाहतुकीला फटका; तर महामंडळाला २५००० रुपयांचा नफा

रत्नागिरी : एसटीच्या शहरी बससेवेसाठी महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना अंमलात आणाव्यात, असा शासन निर्णय करण्यात आला होता. या शासन निर्णयानुसार आता 75 पेक्षा जास्त वय असणाऱया ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या शहरी बससेवेतून मोफत प्रवास करता येणार आहे. तर 65 ते 75 वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि सर्व महिलांना एसटीच्या शहरी बससेवत अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने हि योजना आता सुरु झाली आहे. शहरी बस वाहतूक सेवेत ग्रामीण भागातील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळण्या मार्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी मोकळा केला आहे. काल दिनांक २३ जून पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. काल रविवार असूनही एका दिवसात २८५३ महिलांनी तर ९५ जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात देखील भर पडली असून महामंडळाला या योजनेमुळे काल एका दिवसात २५००० रुपये नफा झाला आहे. वडाप सारख्या अनधिकृत प्रवासी वाहतुकीला यामुळे आता पायबंद बसणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow