दापोली : जामगेतील रस्ता १५० मीटर खचला; वाहतूक बंद

Jun 25, 2024 - 09:44
 0
दापोली : जामगेतील रस्ता १५० मीटर खचला; वाहतूक बंद

दाभोळ : दापोली तालुक्यात अतिवृष्टीमुळे जामगे येथील जवळपास १५० मीटर रस्ता खचला आहे. त्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली आहे.

दापोली तालुक्यात पहिला आपत्तीचा फटका हा जामगे गावातील रस्त्याला बसला आहे. शनिवारी (ता. २२) रात्री हा रस्ता खचला आहे. जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणाऱ्या प्रवाहांमुळे रस्ता खचला आहे. या रस्त्याची आवश्यक दुरुस्ती मृद जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम यांच्याकडून करण्यात येणार आहे. मागील वर्षी डोंगर खोदाईने रस्त्यावर मातीचा खच येऊन मार्ग बंद झाले होते आणि वाहतुकीस अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे यावर्षी दापोली प्रशासन आपत्तीवर बारिक लक्ष ठेऊन आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow