चिपळूण : शिक्षक भारतीच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड

Jun 25, 2024 - 14:39
 0
चिपळूण :  शिक्षक भारतीच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड

कडवई : संत शिरोमणी गोरोबा काका सभागृह खेर्डी, चिपळूण येथे रविवारी झालेल्या शिक्षक भारतीच्या जिल्हा, तालुका पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या नियोजित जिल्हा सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या सभेमध्ये सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, पाचल, तालुका राजापूर या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय पाथरे यांची जिल्हाध्यक्ष, चिपळूणच्या नायशी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक राजेश माळी यांची जिल्हा कार्याध्यक्ष आणि भाईशा घोसाळकर हायस्कूल कडवईचे ज्येष्ठ शिक्षक व विद्यमान जिल्हा कार्यवाह नीलेश कुंभार यांची जिल्हा सचिवपदी फेरनिवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान जिल्हाध्यक्ष ध.ना. पाटील होते. प्रथम सभासदांच्या मृत झालेल्या नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर जिल्हा कार्यकर्त्यांच्या सभेला सुरुवात झाली. जिल्हा कार्यवाह नीलेश कुंभार यांनी सर्वांचे स्वागत करून संघटनेच्या कार्याचा आढावा सादर केला. नूतन कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे उपस्थित सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow