लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

Jun 26, 2024 - 10:12
 0
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

नवी दिल्ली : लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्यास सरकारने नकार दिल्यानंतर अध्यक्षपदाची निवड एकमताने होण्याची शक्यता मावळली असून आता ४८ वर्षांनंतर प्रथमच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. 

भाजपप्रणीत रालोआचे ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के. सुरेश यांच्यात निवडणूक होणार आहे.

संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच संविधान बदलाच्या मुद्यावर सत्ताधारी रालोआ आघाडी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या कॉंग्रेस व विरोधी इंडिया आघाडीने मंगळवारी लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनंतर निवडणूक होणार आहे. 

भाजपप्रणीत रालोआ आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सुरेश मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी रालोआकडून ओम बिलों यांनी उमेदवारी अर्ज भरला. विरोधी इंडिया आघाडीने ठरविल्याप्रमाणे के. सुरेश यांचे नामांकन दाखल केले. बुधवारी (२६ जून) सकाळी ११ वाजता लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow