चिपळूण : गोवळकोटच्या महिलांची नगर पालिकेवर धडक

Jun 26, 2024 - 11:33
 0
चिपळूण : गोवळकोटच्या महिलांची नगर पालिकेवर धडक

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, दुरस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्याने अखेर मंगळवारी गोवळकोट येथील महिलांनी पालिकेवर धडक दिली. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी याविषयी तातडीने दखल घेत बांधकाम विभागास दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. आठवडाभरात दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

गोवळकोट-देऊळवाडी येथील टाकळे यांच्या घराशेजारील महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या शौचालयाचे पत्रे सडले असून गळती लागली आहे, तसेच परशा तुटल्या असून, दरवाजेही खराब झाले आहेत. त्याशिवाय शौचालयासमोरील पाण्याची टाकीदेखील नादुरुस्त झाली आहे. यावर मुख्याधिकारी भोसले यांनी तातडीने शौचालय दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. तशा सूचना बांधकाम विभागास दिल्या. दुरुस्तीच्या कामाचे तातडीने अंदाजपत्रका करावे आणि त्वरित काम करावे, असेही आदेश दिले.

यावेळी माजी नगरसेविका सुषमा कासेकर, स्वाती दांडेकर, प्रतीक्षा खोपडकर, शोभा खोपडकर, सोमा बुरटे, विद्या बुरटे, शर्मिला बुरटे, अर्चना साळवी, उषा शिगवण, सिंधू साजवी, जयश्री चरेकर, अनित भैरवकर, रंजना भैरवकर, दीपाली आग्रे भारती आदवडे, मानसी खापरे, सुमित्रा जाधव, योगिता कुळे, रंजना नाकती आदी महिला उपस्थित होत्या.

अज्ञाताकडून नासधूस
गेल्या काही दिवसांपासून या शौचालयात दगड टाकून, तसेच शौचालयाचा पाईप फोडून अज्ञाताने नगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसानही केले आहे. यापूर्वीही दोन वेळा हे प्रकार घडले होते. त्यामुळे पालिकेने याबाबतही लक्ष घालून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow