अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

Jun 26, 2024 - 11:57
 0
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर काल सर्वोच्च न्यायालयाने दिलासा न देता दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णय येईपर्यंत वाट बघण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर काल दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टाने दिलेल्या जामीनावर स्थगिती कायम ठेवली आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुख्य खंडपीठात सविस्तर सुनावणीची गरज असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. दरम्यान, सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात अटक केली.

काय आहे प्रकरण?

दिल्ली सरकारने 2021-22 साली दारुविक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं होतं. सरकारी महामंडळांऐवजी दारु विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आले होते. दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारु वितरणाची जबाबदारी दिली. केजरीवाल सरकारने म्हटलं की, नव्या धोरणाने दारुचा काळाबाजार थांबला. नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली. मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे. याच प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अटक आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow