परजिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या रागातून शिवार आंबेरे येथे तरुणाला मारहाण

Jun 26, 2024 - 12:05
 0
परजिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या रागातून शिवार आंबेरे येथे तरुणाला मारहाण

रत्नागिरी : तालुक्यातील शिवार आंबेरे येथे परजिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या रागातून तरुणाची दोन अज्ञातांनी दुचाकी भररस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना रविवार, २३ जून रोजी रात्री ११.२० वा. घडली. 

याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात शरद देवीदा हुमे (३७, रा. फिनोलेक्स नगर गोळप, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, रविवारी रात्री फिर्यादी शरद हुमे हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एके-३४१३) वरून येत असताना दोन अज्ञातांनी संगनमताने त्यांची दुचाकी जबरदस्तीने थांबवली. त्यानंतर दुचाकीची चावी काढून घेत ते पर जिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या कारणातून त्यांना मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow