खेडमध्ये हमदुले चाळीची धोकादायक इमारत कोसळली

Jun 26, 2024 - 12:14
Jun 26, 2024 - 14:24
 0
खेडमध्ये हमदुले चाळीची धोकादायक इमारत कोसळली

खेड : येथील महाडनाका परिसरातील पालेकर हॉस्पिटल शेजारील हमदुले चाळ ही जीर्ण झालेली इमारत धोकादायक म्हणून पालिका प्रशासनाने जाहीर केली होती. ६.४५ वाजण्याच्या सुमारास ती अचानक कोसळली. मात्र, मे महिन्यातच येथील रहिवाशी दुसरीकडे रहायला गेले होते त्यामुळे जीवित हानी झाली नाही.

शहरातील महाडनाका परिसरातील पालेकर हॉस्पिटल शेजारील हमदले चाळ ही जीर्ण झालेली इमारत धोकादायक म्हणून नगर परिषद प्रशासनाने जाहीर केली होती. मंगळवारी दि.२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ती अचानक कोसळली. मात्र मे महिन्यातच येथील रहिवाशी दुसरीकडे रहायला गेले होते त्यामुळे जीवित हानी झाली नाही. संबंधित मालकाला जीर्ण इमारतीचा उर्वरित भाग सुरक्षितपणे काढून टाकण्यास सांगणार आल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी सांगितले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow