चिपळुण : जिल्हा परिषदच्या ३७ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

Jun 26, 2024 - 14:08
 0
चिपळुण :  जिल्हा परिषदच्या ३७ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

चिपळूण : शिक्षणाचे धडे देणाऱ्या तालुक्यात ३७ जिल्हा परिषद शाळा नादुरुस्त झाल्या असून, पंचायत समितीच्या शिक्षण विभाकडे पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागानेही नादुरूस्त शाळाचा अहवाल वरिष्ठ स्तराकडे पाठवला आहे. विशेष म्हणजे नव्या शैक्षणिक सत्रास सुरवात झाली असतानाही कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत, आहेत.

खासगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थी पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असले तरी आजही परिस्थिती जैसे थे आहे. असे असले तरी गरीब विद्याथ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा शिक्षणासाठीचा आधार बनून राहिल्या आहेत. मे महिन्याच्या सुट्टीनंतर १५ जुनपासूनच्या शैक्षणिक सत्राला सुरवात झाली आहे.  त्यामुळे खासगीप्रमाणेच जिल्हा परिषद शाळा गजबजल्या आहे मात्र यातील ३७ शाळा नदुरुस्त असून त्याच्या दुरुस्तीचे प्रस्ताव त्या त्या शाळांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत.  विशेष मतदान केंद्रासाठी जिल्हा परिषद शाळाचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये काही नादुरुस्त शाळा प्रशासनाने या निव्द्नुकित्त तातडीने दुरुस्त केल्या होत्या. असे असताना तालुक्यातील ३० शाळा नादुरुस्त झाल्या असून, त्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. दुरुस्तीमध्ये छप्पर वर्गखोली, खिडकी तथा प्रामुख्याने समावेश आहे.

दुरुस्तीच्या प्रतीक्षेतील शाळा
दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिलेल्या शाळामध्ये नांदिवसे गावठाण, गोंधळे भोसलेवाडी, पाचाड नं. १. रेहेळ नं. १. नांदिवसे नं. १. खांडोत्री, मालदोली भोईवाडी, कळंबट-बौद्धवाडी नदिकारे लोगडेवाडी, कोळकेवाडी-पठारवादी, पाथड, अबिटगाव, पिलवली धाजेवाडी नं. २. कापरे देऊळवाडी गुढे, डूगवे, देगाव-देऊळवाडी, कुशिवडे-शिगवणवाडी, कुटरे खैरवाडी, कात्रोळी- देऊळवाडी, बोरगाव नं. १, ओझरवाडी शाळा, कालुस्ते-मराठवाडी, तिवडी-गावठाण, उमरोली नं. १, उमळे नं. १. उभळे नं. २, मार्गताम्हाणे नं. १ व २, भोम नं. १. कुशिवडे नं. १, खेर्डी-शिगवणवाडी, मुंढेतर्फे सावर्डे, तळसर नं. १, कोसबी नं. १. पाचाड बुरुडवाडी, दुर्गवाडी नं. २.  दळवटणे नं. १ या शाळांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow