रत्नागिरी : मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रशिक्षण

Jun 26, 2024 - 15:12
Jun 26, 2024 - 15:34
 0
रत्नागिरी : मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रशिक्षण

रत्नागिरी : मच्छीमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध संकटांना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे, आदी घटनांवेळी काय प्राथमिक उपचार करावे याचे प्रात्यक्षिक रिलायन्स फाउंडेशन, नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दाखविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, प्रणाली गोरे, नागरी संरक्षण केंद्राचे सहायक उपनियंत्रक ए. एन. गधरी, योगेश पावसकर उपस्थित होते. अजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाची माहिती दिली. आपत्तीच्या वेळेस नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow