मोसमी पावसाने रत्नागिरी जिल्हा व्यापला

Jun 11, 2024 - 09:57
 0
मोसमी पावसाने रत्नागिरी जिल्हा व्यापला

◼️ पुढील दोन दिवस किनारपट्टी भागात 'ऑरेंज अलर्ट'  

रत्नागिरी : सलामिलाचंजोर धरणाऱ्या मोसमी पावसाने सोमवारी हलक्या सरीचा राबता ठेवला. गेले दोन दिवस दमदार कोसळल्यानंतर आता रत्नागिरीसह कोकणातील खरीप क्षेत्रात आता लावणीचा पेरा टाकण्याची लगबग सुरू झाली आहे. 

दरम्यान, सोमवारी सकाळी पावसाने उसंत घेतली. मात्र, दुपारनंतर काही भागात जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली. सलामिलाच जोर धरणाऱ्या पावसाचा जोर पुढील दोन दिवस वाढणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
 
गेल्या तीन चार दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, ८ जून पासून मोसमी पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात सक्रीय झाला. अनेक भागात गेल्या शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. सलामीलाच जोर धरणाच्या पावसाचा जोर पुढील दोन दिक्स वाढणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.

किनारपट्टी भागातील ठाणे जिल्ह्याचा अपवाद वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. गेले ४ दिवस रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. सकाळी ढगाळ वातावरण, पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेले दोन दिवस बहुतांश तालुक्यात ५० मि. मी. पेक्षाही जादा पाऊस झाला.

जोरदार सलामीनंतर आता मोसमी पाऊस चांगलाच सक्रीय झाला आहे. रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात ४६.१० मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली तर सोमवारी पावसाने सकाळी उसंत घेत वातावरणातील मळभ काही काळ दुरु केले. मात्र त्यानंतर काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरुपाच्या सरींची आवक जावक सुरू होती. दोन दिवस पावसाच्या दमदार हजेरीनंतर आता रानागिरी जिल्ह्यातील भात क्षेत्रात रोपवाटीका तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे तर काही भागात हलक्या भिजलेल्या जमिनीची उकल करून घेण्याच्या कामाला वेग आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow