मंडणगड तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.१६ टक्के

May 28, 2024 - 12:50
 0
मंडणगड तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.१६ टक्के

मंडणगड : माध्यमिक शालांत परिक्षा २०२४ मध्ये मंडणगड तालुक्याचा निकाल ९८.१६ इतका टक्के इतका लागला. या परीक्षेकरिता तालुक्यातील २६ शाळांमधून ७०९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यातील विद्यार्थी ६९६ उत्तीर्ण झाले. यात १३४ डिस्टीक्शन श्रेणीत २९४ प्रथम श्रेणीत, २२८ द्वितीय श्रेणीत, ४० तृतीय श्रेणीत विद्यार्थी पास उत्तीर्ण झाले. 

गत वर्षीच्या वर्षीच्या तुलनेत तालुक्याचा निकालात साडेसहा टक्के इतकी वाढ झाली आहे. तालुक्यातील तब्बल २० शाळांचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या ३५० मुलांपैकी ३४३ मुले पास झाली त्यांची सरासरी ९८.०० इतकी आहे तर परीक्षेस प्रविष्ठ ३५९ मुलींपैकी ३५३ मुली परिक्षेत उत्तीर्ण झाल्या त्यांची सरासरी ९८.३२ टक्के इतकी लागली आहे.

या विषयी प्राथमीक माहितीनुसार ओमकार गोरड व जय पोस्टुरे यांनी प्रत्येकी ९४.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. अनुष्का गमरे हिने ९४ टक्के मिळवून तालुक्यात व्दितीय तर सलोनी म्हसकर ९३.८० गुण मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला.

शासकीय आश्रम शाळा वेरळ
रोशन हिलम, ७३.६० प्रथम, सागर पवार, ७२.८० द्वितीय, सुमित पवार ६३.८० तृतीय (१६ विद्यार्थी प्रविष्ठ १६ उत्तीर्ण) शाळेचा निकाल शंभर टक्के

योजक इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड
नीलम मेहथा, ९३.४० प्रथम, प्रथमेश त्रिपाठी ८७.४० व्दितीय, अनन्या दुर्गवले ८७.०० तृतीय (१६ विद्यार्थी प्रविष्ठ १६ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

डॉ. बाबासाहेब आंबेकडर हायस्कूल मंडणगड
ओमकार गोरड ९४.२० प्रथम, अनुष्का गमरे ९४.०० व्दितीय, सलोनी म्हसकर ९३.८० तृतिय (१४८ विद्यार्थी प्रविष्ठ १४५ उत्तीर्ण) शाळेचा निकाल ९७.९७.

श्रीपाद त्रौलोक्य पंचक्रोशी माध्यमीक विद्यामंदिर उमरोली
मेहल पवार ८०.६० प्रथम, पार्थ मांडवकर ७०.०० व्दितीय, सार्थक शेडगे ६९.४० तृतीय (१३ विद्यार्थी प्रविष्ठ १३ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के,

देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देव्हारे
मेघा कुळे ८८.२० प्रथम, रिया गिजे ८२.६० व्दितीय, सम्यक तांबे ८०.४० तृतिय (२८ विद्यार्थी प्रविष्ठ २८ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

लाटवण  पंचक्रोशी मराठी माध्यमीक विद्यामंदिर लाटवण
दीक्षा राणे ८७.८० प्रथम, आयुष सोंडकर ८१.४० व्दितीय, भक्ती सुतार ७९.४० तृतीय (३८ विद्यार्थी प्रविष्ठ ३८ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

उर्दू माध्यमिक विद्यालय पंदेरी
सफवान उकये ८५.८० प्रथम, सदफ ठोकन ८१.८० द्वितीय, नायाब ठोकन ८०.६० तृतीय (प्रविष्ट २० उत्तीर्ण १८) शाळेचा निकाल ९० टक्के

इनामदार पब्लिक स्कूल शिपोळे वेसवी 
आस्मा मुकादम ७१.४० प्रथम, मुमताह खतीव ६६.२० द्वितीय, अदिवा किल्लेदार ६६.०० तृतीय (प्रविष्ट ०५ उत्तीर्ण ०५) शाळेचा निकाल १०० टक्के.

हुतात्मा तुकाराम बबन भोईटे विद्यामंदिर कुंबळे 
देवांग जाधव ८५,४० प्रथम, रविना म्हाप्रळकर ८४.६० व्दितीय, स्वाती चव्हाण ८०.०० तृतीय (२९ विद्यार्थी प्रविष्ठ २८उत्तीर्ण) शाळेचा निकाल ९६.५५ टक्के

लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव
सोनले गमरे ९१.०० प्रथम, आदित्य घाणेकर ८७.६० व्दितीय, सानिका पवार ८५.६५ तृतीय (३७ विद्यार्थी प्रविष्ठ ३७ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

जर्मन परकार हायस्कूल बाणकोट 
असरा परकार ९२.०० प्रथम, मोहम्मद आमदानी ८८.०० व्दितीय, झारा पेवेकर ८७.८० तृतीय (३४ विद्यार्थी प्रविष्ठ ३४ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड 
महेक खलफे ८८.६० प्रथम, आर्यन जाधव ८५.६० व्दितीय, अर्थव परब ८५.४० तृतीय (२६ विद्यार्थी प्रविष्ठ २६उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

न्यू इंग्लिश स्कूल तुळशी 
सागर महाडिक ८६.८० प्रथम, श्रेया जाधव ८०.८० व्दितीय, साहिल करजेवकर ८०.६० तृतिय (१९ विद्यार्थी प्रविष्ठ १९ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली
रिया सावंत ७८.०० प्रथम, आर्यन जाधव ७५.०६ द्वितीय, समृद्धी धोंडगे ७५.२ तृतीय (१६ विद्यार्थी प्रविष्ठ १५ उत्तीर्ण) शाळेचा निकाल ९३.७५.

के. व्ही. भाटे विद्यामंदिर वेसवी
दुर्गा पाडलेकर ८७.०० प्रथम, प्रफुल वैराग ८१.८० व्दितीय, योगेश देवकर ८०.८० तृतीय (५३ विद्यार्थी प्रविष्ठ ५३ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर आंबेडकर
जय पोस्टुरे ९४.२० प्रथम, अमित चोरगे ८४.४० व्दितीय, तन्वी हरावडे ७९,४० तृतिय (१७ विद्यार्थी प्रविष्ठ १५ उत्तीर्ण) शाळेचा निकाल ८८.२३ टक्के

ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड
स्नेहकुमारी मेहथा ७९.०० प्रथम, समृध्दी पवार ७६.२०, व्दितीय, वैष्णवी कांबळे ७५.८० तृत्तिया क्रमांक मिळवीला. (६) विद्यार्थी प्रविष्ठ ६ उत्तीर्ण) शाळेचा निकाल १०० टक्के.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 28/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow