रत्नागिरीत १ जुलैपासून इंग्लिश स्पीकिंग सर्टिफिकेट कोर्स

Jun 26, 2024 - 12:39
Jun 26, 2024 - 15:40
 0
रत्नागिरीत १ जुलैपासून इंग्लिश स्पीकिंग सर्टिफिकेट कोर्स

रत्नागिरी : येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या फाॅरेन लॅग्वेज सेंटरमध्ये येत्या १ जुलैपासून इंग्लिश स्पीकिंग सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात येणार आहे.

या कोर्सच्या माध्यमातून ऐकण्याचे कौशल्य, अस्खलितपणे आणि आत्मविश्वासाने बोलणे, नावीन्यपूर्ण लेखन, प्रभावीपणे वाचन यांचा समावेश आहे.

यामध्ये मुलाखतीला सामोरे जाणे, वादविवादांमध्ये सहभाग, वक्तृत्व कौशल्ये विकसित करणे, गटचर्चेत सक्रिय सहभाग घेणे असे उपक्रम राबविले जातील. अभ्यासक्रमाच्या शेवटी सर्वसमावेशक तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ महिने आहे.

अधिक माहितीसाठी श्रावणी सरदेसाई (९४२३२९१३२९), वैभव कानिटकर (९४२०७३६८१३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow