घरात, परिसरात साठलेले पाणी ठेऊ नका; डेंग्यू आजार नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

Jun 26, 2024 - 17:25
 0
घरात, परिसरात साठलेले पाणी ठेऊ नका; डेंग्यू आजार नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

रत्नागिरी : डेंग्यु आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हा डास कारणीभुत आहे. डेंग्यु झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील डेंग्यु विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात असा विषाणुजन्य डास निरोगी व्यक्तीस चावल्यास डेंग्यु होण्याची शक्यता वाढते.

त्यामुळे डेंग्यू रोगाचा प्रसार थांबवयाचा असल्यास एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे आवश्यक आहे. डेग्यू डासाची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंडयातुन बाहेर पडणा-या डासांच्या अळया त्याच पाण्यात वाढतात. ४-५ दिवसानंतर या अळयांचे कोष बनतात व हे कोषही पाण्यातच जिवंत राहतात आणि कोषातून २ दिवसांनी डास बाहेर पडतात. डासांच्या अंडयापासुन त्याचा डास होण्यास ०८-१० दिवसांचा कालावधी लागतो.

डेंग्यु आजाराची लक्षणे:-
तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी,थंडी वाजुन ताप येणे,उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजुस दुखणे, ,ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो,अंगावर पुरळ, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, घाम येऊन अंग गार पडणे,त्वचेखाली, नाकातून रक्तस्त्राव होणे व रक्ताची उलटी होणे. रक्तमिश्रीत / काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, काही रुग्णांमध्ये या दरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो.

जनतेने घ्यावयाची काळजी :-
घरात पाणी साठविण्याची सर्व भांडयातील पाणी वापरुन रिकामी करुन घासुन / पुसुन कोरडी करावी व एक दिवस कोरडी ठेऊन त्यानंतरच पाणी भरा, घरातील मोठ्या टाक्या ज्या रिकाम्या करता येणे शक्य नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवा, घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालच्या ट्रे मधील पाणी काढून स्वच्छ करा, अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार वस्तूं,प्लास्टिक बाटल्या, नारळाच्या करवंट्या ,खराब टायर्स यांची विल्हेवाट लावा,परिसरातील पाण्याची डबकी वाहती करा. जी डबकी बुजवता येणार नाही त्यात अळीनाशक औषध टाका किवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मदतीने गप्पी मासे सोडा,घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा. शौचालय आणि ड्रेनेजच्या व्हेंन्ट पाईपला जाळया बसवा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी रोज बदला, ताप आल्यास शासकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. जनतेने स्वतःहून सहभागी होऊन या सर्व उपाययोजना राबवल्या तर डेंग्यु आजारावर आपण नियंञण आणू शकतो, असे अवाहन मुख्य अधिकारी कार्यकारी किर्तीकीरण पूजार, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 26-06-2024



What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow