राजापूर : कुवेशी येथे फासकीत अडकलेल्या काळ्या बिबटयाला जीवदान

Jun 27, 2024 - 09:50
 0
राजापूर : कुवेशी येथे फासकीत अडकलेल्या काळ्या बिबटयाला जीवदान

राजापूर : दिनांक २६/०६/२०२४ रोजी  मौजे- कुवेशी येथे श्री. हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आंबा कलम बागेच्या कंपाउंडला लावलेल्या तारेच्या फासकीत वन्यप्राणी काळा बिबट्या (Black Panthar) अडकल्याची माहिती श्री. पद्मनाथ उर्फ पिंट्या कोठारकार यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून कळविले. सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन तारेच्या फासकित अडकलेल्या बिबट्याला फासकी मुक्त करुन सुस्थितीत पिंजऱ्यात घेऊन पशू वैद्यकीय अधिकारी राजापूर यांचे कडून बिबट्याची तपासणी केली असता, सुस्थितीत असलेची खात्री केली. 

सदर काळा बिबट्या (Black Panthar) नर जातीचा असून वय सुमारे ५ ते ६ वर्ष आहे. त्यानंतर  मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्री.वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास त्याचे नैसर्गिक अदिवासात मुक्त करण्यात आले. 

सदर कामगिरीसाठी मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल श्री.प्रकाश सुतार, वनपाल राजापूर श्री. जयराम बावदाणे, वनपाल पाली श्री. न्हानु गावडे, वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार, वनरक्षक रत्नागिरी श्री. प्रभू साबणे व रेस्क्यू टीमचे श्री.दीपक चव्हाण, श्री.विजय म्हादये, श्री.दीपक म्हादये, श्री.नितेश गुरव, श्री.संतोष चव्हाण, श्री.निलेश म्हादये उपस्थित होते.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६  किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्री प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow