संगमेश्वर : आंगवली लाखणवाडी पाखाडीचे काम अर्धवट

Jun 27, 2024 - 12:24
 0
संगमेश्वर : आंगवली लाखणवाडी पाखाडीचे काम अर्धवट

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली दुवेरी पूल ते आंगवली लाखणवाडी या पाखाडीचे काम ठेकेदाराने अर्धवट टाकून पलायन केल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

आमदार फंड २५ बाय १५ या निधीतून या पाखाडीला मंजूर मिळाली होती. गत गणेशोत्सवप्रसंगी याचे भूमिपूजन झाले होते. यावर्षी मे महिन्याच्या शेवटी काम सुरू झाले. असे असताना ठेकेदार काम अर्धवट ठेवून फरार झाला आहे. या पाखाडीसाठी अंदाजे ३ लाख रुपये मंजूर झालेले आहेत. फाडी संपली, माणसे मिळत नाहीत, अशी थातूरमातूर उत्तरे सदर ठेकेदाराने दारी. आमदार शेखर निकम यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. आंगवली गावात चांगल्या दर्जाची कामे होत नाही. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. लाखणवाडी रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर चिखल आला असून, खूप खड्डे पडले आहेत. यामुळे ग्रामस्थ या कामाबाबत नाराज झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow