या पुढल्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू : उद्धव ठाकरे

Jun 27, 2024 - 14:20
 0
या पुढल्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू : उद्धव ठाकरे

मुंबई :जपासून विधानसभा अधिवेशनला सुरूवात झाली. पहिलाचा दिवस दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीमुळे गाजला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते देवेंद्र फडवणीस यांनी आज विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केला.

त्यामुळे आजच्या अधिवशेनापेक्षा या दोन नेत्यांच्या भेटीचीच चर्चा जास्त रंगली. मात्र या भेटीतून कुठलेही अर्थ काढू नका, ती फक्त योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. असं म्हणतात की भिंतीला कान असतात, पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू, अशी मिश्कील टिपण्णी ठाकरे यांनी केली. फडणवीस व आपल्यात कोणतीही राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.

पुणे ड्रग्स प्रकरणावर आवाज उठवणार

पुण्यातील ड्रग्स प्रकरणावर आम्ही आवाज उठवणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही त्यावर आवाज उठवणार आहे. पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. सरकारला खेचायचं आहे. हे ड्रग्स येतात कुठून? राज्यातील केमिकल्सचे कारखाने हे सोर्स आहे का, उद्योगमंत्री काय करतात. उद्योगमंत्र्यांचे हे सोर्स आहे का या गोडाऊनचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ड्रग्स प्रकरणावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कुणाचेही सगे सोयरे असू द्या. विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून तुमच्या काळात जास्त ड्रग्स सापडले असे फालतू उत्तर नको. त्याच्या मुळाशी जा आणि खणून काढा. जे पोलीस अधिकारी कर्तव्यात कसूर करतात त्यांना निलंबित केलं पाहिजे. त्यांना सेवेतून मुक्त केलं पाहिजे, अशी मागणी उद्धव यांनी केली.

हा गाजर संकल्प आहे

विधानसभा अधिवेशनात उद्या अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. मात्र हा गाजर संकल्प आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्या गाजरं दाखवलं जाणार आहे. आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी किती झाली. त्याची श्वेतपत्रिका काढा. ही श्वेतपत्रिका कोरा कागद असणार आहे. याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ?

महायुतीत अपयशाच्या धन्याचा चेहरा पुढे येऊ द्या. एकमेकांवर आरोप करत आहेत. आम्ही विकास आघाडीचा चेहरा योग्यवेळी बाहेर आणू. महाविकास आघाडीचा चेहरा महाराष्ट्र आहे. मी वर्धापन दिनाच्या भाषणात म्हणालो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. त्यांच्या अपयशाचा चेहरा नक्की कोण हे समोर येऊ दे. आमच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow