तब्बल ४ वर्षांनंतर होणार संगमेश्वरची आमसभा

Jun 28, 2024 - 11:31
Jun 28, 2024 - 12:22
 0
तब्बल ४ वर्षांनंतर होणार संगमेश्वरची आमसभा

देवरूख : संगमेश्वर तालुक्याची आमसभा तब्बल चार वर्षांनंतर येत्या जुलै महिन्यात होणार आहे. यासाठी पंचायत समितीकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. 

शेखर निकम हे आमदार झाल्यानंतर २०१९ पासून संगमेश्वर तालुक्याची आमसभा आजतागायत झालेली नाही. मात्र आमदार शेखर निकम यांनी तालुक्यात विकासात्मक कामे या पाच वर्षांत केली आहेत. यात महत्त्वाचे, अनेक वर्षांपासून मागणी असलेले पूल उभारले आहेत. पाणीप्रश्न तर तत्काळ मार्गी लावले आहेत. तरीही जनतेचे काही प्रश्न प्रलंबित असून, यासाठी आमसभा आवश्यक असते.

आमदार शेखर निकम यांचा आमदारकीचा कार्यकाल सुरू होताच कोरोनाचे संकट उभे राहिले. यामुळे दोन वर्षे यातच गेली होती. यानंतर आमसभा घेण्याचा तालुक्यातून कोणताच आवाज उठला नाही. तालुक्यात आमदार सतत संपर्कात राहून जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होतात. यामुळेच कदाचित आमसभेची गरज भासली नाही.

आमदारांचा कार्यकाल आता संपत आला आहे. यामुळे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी केलेल्या पाच वर्षातील कामाचा ऊहापोह करणे, नवीन विकासाची दिशा सांगणे, याबाबी सर्व सामान्य जनतेसमोर आणण्यासाठी आमसभा हे प्रभावी माध्यम असल्याने आमदारही हे हक्काचे व्यासपीठ वाया घालवणार नाहीत.

आ. साळवी, आ. सामंत उपस्थित राहणार का?
तालुका तीन विधानसभा मतदार संघात विभागला असल्याने तालुक्यातील तीन आमदार आहेत. या सभेला सहअध्यक्ष म्हणून राजापूरचे आमदार राजन साळवी व रत्नागिरी पालकमंत्री तथा आमदार उदय सामंत उपस्थित राहतील का, असा प्रश्न आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow