राजेंद्र माने अभियांत्रिकीचा भारतातील सर्वोत्तम खासगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग सातव्यांदा २५० महाविद्यालयांमध्ये समावेश

Jun 28, 2024 - 12:29
Jun 28, 2024 - 12:36
 0
राजेंद्र माने अभियांत्रिकीचा भारतातील सर्वोत्तम खासगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग सातव्यांदा २५० महाविद्यालयांमध्ये समावेश

साडवली : भारतातील शासकीय तसेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सर्वेक्षणात संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खासगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग सातव्यांदा पहिल्या २५० महाविद्यालयांमध्ये समावेश झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील एका मासिकाने केलेल्या या सर्वेक्षणात माने अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रात ३५व्या क्रमांकावर असून मुंबई विद्यापीठात ११व्या क्रमांकावर मानांकित झाले आहे.

या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांच्या आधारे भारतातील महाविद्यालयांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. या निकषांनुसार महाविद्यालयाची सर्वांगीण माहिती, नॅक अॅक्रेडिटेशनची श्रेणी, प्रवेशप्रक्रिया, शिक्षणशुल्क, जमाखर्चाचा तपशील, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता व अनुभव, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिसंवादातील सहभाग आणि शोधनिबंध सादरीकरण देश विदेशातील माजी विद्यार्थी कार्यरत असलेल्या नामांकित आस्थापनांची माहिती व माजी विद्याथ्यांचा महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार, संदर्भग्रंथ आणि नामांकित नियतकालिकांनी समृद्ध ग्रंथालय, विविध विषयावरील तज्ज्ञांची व्याख्याने इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करून राष्ट्रय क्रमवारी निश्चित करण्यात येते.

हे महाविद्यालय कोकण विभागातील एकमेव एनबीए मानांकन प्राप्त असून, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाला पुढील तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन मिळाले आहे तसेच दुसऱ्यांदा झालेल्या नॅक मूल्यांकनामध्ये बी प्लसप्लस ग्रेड प्राप्त केली आहे. इंजिनिअरिंग महाविद्यालयाची निवड करताना एनबीए आणि एसएएसीसारखी मानांकने अतिशय महत्त्वाची मानली जातात. अशा महाविद्यालयांत उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि चांगले शिक्षक आहेत, असे सूचित केले जाते. यापूर्वीही महाविद्यालयाने एआयसीटीई सीआयआयने २०१६, २०१७ तसेच २०२० यावर्षी घेतलेल्या सर्वेक्षणात सुवर्ण श्रेणी प्राप्त केली होती. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow